टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.८ नोव्हेंबर २०२२ : श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव महाविद्यालयाच्या कृषिदुतांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिंप्री कोलंदर येथे आगमन झाले. यावेळी सरपंच सोनाली बोबडे, उपसरपंच मनोहर शिंदे, ग्रा.पं. सदस्य हनुमंत बोबडे, ग्रा.पं.कर्मचारी शिवराम पवार व ग्रामस्थ यांनी त्यांचे स्वागत केले.
कृषिदुतांनी या माध्यमातून पिंप्री कोलंदर गावात ग्राम चर्चासत्र आणि ग्रामीण मुल्यमापन (पी.आर.ए.) उपक्रमाचे आयोजन केले. या माध्यमातून गावातील नैसर्गिक स्त्रोत, शेतीखालील क्षेत्र, गावातील आर्थिक स्थिती, सामाजिक व्यवस्था, कृषि व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्था इत्यादी विषयक माहिती सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून समजून घेतली.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. के.एच. निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एस. गोंधळी, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.एस. बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत हर्षद पवार, सौरभ पवार, किरण पेलमहाले, कृष्णकांत फडतरे, संकेत राजोळे यांनी येथील शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा