टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.९ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्र हे राज्य महीलांचा मान, सन्मान, आदर करून संस्कृती जपणारे राज्य आहे. आणि या राज्यामधील शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे तमाम महीलांचा अपमान झालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री सत्तार यांना तात्काळ मंत्रिमंडळातून हटवावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने मा. डॉ. प्रणोतीमाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली व तालुक्यातील तमाम महीला भगीणींच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
खासदार सुप्रियाताई सुळे या उत्कृष्ट संसदपटु असुन महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नेत्या आहेत. सत्तार यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अपेक्षार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे. अब्दुल सत्तार यांची ही पहीलीच वेळ नाही. यापुर्वीही त्यांनी जिल्हाधिका-यांना दारू पिता का ? असा प्रश्न विचारला होता. मंत्रीमंडळात असणा-या जबाबदार मंत्रयाने अशी भाषा वापरणे आणि भारतातील संसदेत काम करणा-या एका महीला खासदाराबाबत अशाप्रकारे बोलणे कितपत योग्य आहे ?
या सरकारमधील मंत्रयांची महीलांविषयी काय भुमिका आहे. महीलांचा द्वेष कशा पध्दतीने करतात, यांचा महीलाविषयी काय विचार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. सत्तार यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरांवर निषेध होत आहे. मंत्रयांनी काही मर्यादा सांभाळायच्या असतात परंतु या मर्यादांचा वारंवार हे मंत्री उल्लंघन करत आहेत. यामुळे देशभरात महाराष्ट्र राज्यांची मान शरमेने झुकत आहे.
या वक्तव्याचा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने मा. डॉ. प्रणोतीमाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली व तालुक्यातील तमाम महीला भगीणींच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री सत्तार यांचा राजीनामा घेउन त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करून त्यांचेवर गुन्हा दाखल करावा असे या निवेदनात नमूद करण्यात आले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा