कोळगावच्या सौ प्रतिभा धस यांची रविदासिया हेल्पलाइनच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी निवड!

टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि.११ नोव्हेंबर २०२२ : कोळगाव येथील चर्मकार समाजाच्या सौ प्रतिभा विलास धस यांची रविदासिया हेल्पलाइनच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जालिंदर सोनवणे यांनी त्यांना तसे नियुक्तीचे पत्र दिले आहे.

कोळगाव येथील रहिवासी असलेल्या मातोश्री जिजाऊ महिला बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, सौ प्रतिभा विलास धस यांची रविदासिया हेल्पलाइनच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष जालिंदर सोनवणे व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बहुमोल कामगिरीबद्दल दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे येथे निवड केली आहे.

या निवडीबद्दल सौ प्रतिभा धस यांनी सांगितले की ,चर्मकार समाजातील महिला व इतरांसाठी येथून पुढे मी काम करणार असून शासनाच्या विविध योजना या समाजासाठी पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच या समाजातील महिलांच्या विविध समस्या, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रावर लवकरच दौरा करणारा असून या सामाजिक संस्थेचे संघटन वाढविणार आहे.

या संस्थेचे अध्यक्ष जालिंदर खामकर यांनी, गुरु रविदास महाराजांच्या मानवतावादी विचारधारेस अनुसरून त्यांनी या पुढील काळात प्रचार व प्रसार करून समाजातील सर्वधर्म प्रेम वाढवावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते,जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रतिभा पाचपुते ,पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड ,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन नलगे, कोळगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शरद लगड, अमित लगड ,कर्मवीर प्रतिष्ठानच्या संचालिका सौ पल्लवी शिंदे ,युवा नेते सनी भाऊ धस व इतरांनी अभिनंदन केले आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : महेशकुमार शिंदे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!