कापसाचा भाव वाढतोय; मात्र कांद्याचा भाव उतरतोय कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर!

टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी : दि.१६ नोव्हेंबर २०२२ : सद्यस्थितीला श्रीगोंदा तालुक्यात कापसाची तोड अंतिम टप्प्यात येत असतानाच, कापसाचा भाव वाढला गेला आहे .मात्र वखारीमध्ये सुरक्षित ठेवलेल्या कांद्याच्या भावाला मात्र घरघर लागल्याची चर्चा कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. दरम्यान कापसाचा भाव मागील पंधरा दिवसांमध्ये सहा हजार रुपये साडेसहा हजार पर्यंत होता. तो आता ९५०० च्या दरम्यान वाढला गेल्याने कापूस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

दरम्यान गेल्या महिन्यांमध्ये पाऊस थांबल्याने काही दिवसानंतर वापसा झाला. त्यामध्ये उन्हाचीही तीव्रता वेगाने वाढत गेली .तस तसा कापूस फुलत गेला त्यामध्ये अतिवृष्टीने या कपाशींना मोठा फटका बसल्याने कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा कापूस उत्पादकांमधून व्यक्त केला जात आहे. मात्र गेल्या महिन्यात कापसाची तोड सुरू झाल्यानंतर कापूस उत्पादकांनी तोडणी झालेला कापूस बाजार समितीमध्ये दाखल केला. परंतु अतिवृष्टीचा फटका कापसाचा रंग बदलला काळा पडला, हे कारण कापूस व्यापाऱ्यांनी पुढे केल्याने हा भाव जवळपास एक महिना ६ ते ६५०० पर्यंत कायम ठेवला. आता कापूस तोड अंतिम टप्प्यात येत असतानाच व्यापाऱ्यांनी कापसाचा भाव चढवला. तो आता ९५०० रुपये पर्यंत पोहोचला. असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान कांदा उत्पादकांची देखील बाजार समितीमध्ये मोठी दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा कांदा उत्पादकांमधून होत आहे. गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी वखारीमध्ये सुरक्षित रित्या ठेवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव दिला जात आहे. त्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपूर्वी कांद्याचा भाव दहा ते बारा असल्याने अनेक कांदा उत्पादकांनी कांदा आपला सुरक्षित रित्या प्रसंगी उकिरड्यावर गेला, तरी हरकत नाही. परंतु कांदा वखारी मध्ये ठेवला अतिवृष्टी होऊन देखील या वखारीतील कांद्याला तीळ मात्र डंख लागला गेला नाही. अशी काळजी देखील कांदा उत्पादकांनी घेतली. असे असताना कांद्याचा भाव मात्र वाढवला गेला नाही. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी आमरण उपोषण, आंदोलने केली. त्यानंतर शासनाला जागा आली. आणि कुठेतरी हा कांदा जवळपास ३० ते ३२ रुपये किलोने मागील दहा दिवसांपूर्वी पोहोचला. आता पुन्हा हा भाव कमी करण्यात आल्याची माहिती कांदा उत्पादकात शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.

आता पुन्हा कांदा जवळपास १७ ते १८ रुपये पर्यंत उतरला गेला आहे. त्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टीसह खरीप हंगाम महत्त्वाचे पीक पांढरे सोने म्हणून समजले जाणारे कापूस यासह वखारीतील उत्तमरीत्या कांद्याला कवडीमोल किंमत येत असल्याने कापूस उत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी द्विधा मनअवस्थेत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान चालू वर्षी श्रीगोंदा तालुक्यात विशेषता कुकडी लाभक्षेत्रात कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. त्यानंतर वेळेत पाऊस झाल्याने कपाशीची पिके तरारली. हे पीक जोमात असताना मात्र अतिवृष्टीने अखेरच्या क्षणी गाठले. सतत दीड महिना अतिवृष्टीचा वर्षाव झाल्याने उभी पिके पाण्यात ऊन मळून गेली. त्यामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली. त्यामध्ये कापूस व कांद्याच्या भावात होत असलेली चढउतार त्यामुळे शेतकरी अनभिज्ञ असून, व्यापाऱ्यांनी मात्र कापूस पिकातून आपले उखळ पांढरे करून घेतल्याची चर्चा देखील कापूस उत्पादकांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. कष्टकरी कापसे उत्पादक व कांदा उत्पादकांचे मात्र बाजार समितीमध्ये भर निराशा होत असल्याची भावना देखील व्यक्त होत आहे. आता कांद्याचा भावही वेळोवेळी खाली येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले असून. जगाचा पोशिंदा म्हणून कष्टकरी शेतकऱ्यांवर मात्र मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : नंदकुमार कुरुमकर)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.4 ° C
21.4 °
21.4 °
96 %
7.5kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!