अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याची उपअभियंता कराळे व कनिष्ठ अभियंता पाचनकर यांच्याकडून पाहणी!

टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी : दि.१७ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट या तीन किलोमीटर नादुरुस्त रस्त्याची पाहणी केली. जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समितीचे उपअभियंता सुरेश कराळे व कनिष्ठ अभियंता प्रकाश पाचनकर यांनी यां नादुरुस्त रस्त्याची बुधवारी दुपारी पाहणी करून यां नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती करण्याचे संकेत दिले आहे.

दरम्यान लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट हा रस्ता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे समाविष्ट आहे. या रस्त्याची गेल्या पाच महिन्यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. सदर रस्ता दुरुस्त करताना ग्रामपंचायत मार्फत हा निधी रस्त्यासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. सदर रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला गाळप हंगामात या रस्त्यातून शेकडो वाहने ये जा करतात. परंतु मध्यंतरीच्या अतिवृष्टीने या रस्त्याची पूर्णतः वातहात होऊन जागो जागी हा रस्ता दबला गेला असून, मोठ्या प्रमाणात खड्डे व खडी उघडी पडल्याने वाहन चालकांना या रस्त्यातून वाहन चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यातून अपघात वारंवार होत आहे.

या प्रश्नासंदर्भात मागील आठवड्यात या रस्त्याचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून संबंधित बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर काल जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समितीचे उपअभियंता सुरेश कराळे व बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रकाश पाचनकर यांनी या वृत्ताची दखल घेत नादुरुस्त रस्त्याची पाहणी करून सदर रस्ता दुरुस्त करण्याचे वचन दिले. या पाहणी दरम्यान उपाभियंता कराळे यांनी रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी थेट सदर रस्त्याला खेटून जमिनी तयार केलेल्या असल्यामुळे सदर पावसाचे पाणी पूर्णतः रस्त्यावर येऊन बेवारसपणे वाहत आहे. त्यामुळेच या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली दिसून येते. त्यामध्ये मध्यंतरी अतिवृष्टीमुळे सदर शेतकऱ्यांच्या जमिनीतून थेट रस्त्यावर पाणी वाहत गेल्यामुळे हा रस्ता आणखीनच खराब होऊन दबला गेला आहे. असा दावा संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

संबंधित बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावच्या ग्रामपंचायतीने संबंधित शेतकऱ्यांना ठरावाद्वारे सूचना देऊन त्यांच्या शेतीच्या पाण्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे. तर वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व शेतकऱ्यांनी योग्य संवाद साधून रस्त्याच्या दोन्हीही बाजूने ग्रीनेच गटार लाईन खोदण्याची आवश्यकता आहे. अन्यथा या रस्त्यावर कितीही निधी उपलब्ध करून खर्च केला तरी हा रस्ता पुन्हा जशी ते होऊ शकतो व शासनाचा निधी देखील पाण्यात जाऊ शकतो त्यासाठी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र व्यवहार करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन शेतीच्या पाण्याची ग्रेनीज गटार लाईन द्वारे विलेहाट लावण्याची आवश्यकता आहे असे देखील वाहन चालक सांगतात

त्यामुळे रस्ता दुरुस्त करताना संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाने देखील लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट रस्त्याची लांबी रुंदी तपासून पाहण्याची आवश्यकता आहे .असे मत वाहन चालकांमधून व्यक्त केले जात आहे. प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे जमिनी या थेट रस्त्याच्या लगत असल्याने पावसाळ्यामध्ये हा प्रश्न मोठा गंभीर बनला जातो. आता तर साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. रात्री अप रात्री वाहन चालक, ऊसतोड बैलगाडी साखर कामगार इत्यादींना ऊस वाहतूक करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा तक्रारी देखील ऊसतोड मजुरांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करताना प्रथम रस्त्याचे मोजमाप करूनच विना विलंब रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालक व प्रवासी मधून होत आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : नंदकुमार कुरुमकर)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!